Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बंधाऱ्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बंधाऱ्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स शेगाव - चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन शेगावा (बु) येथून जवळच असलेल्...

  • बंधाऱ्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
शेगाव -
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन शेगावा (बु) येथून जवळच असलेल्या निमडेला चंदई नाला प्रकल्प येथील बंधाऱ्यावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन शेगाव येथे दिली असता ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून चंदई नाल्यातील पाण्यात तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. सदरील ईसमाच्या हातावर रामानंद असे नाव गोंटले असुन हा इसम बाहेरील राज्यातला असावा असा तर्क लावल्या जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top