Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ताडोब्यातील 'गाईड्स'ची आ. मुनगंटीवारांनी थोपटली पाठ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ताडोब्यातील 'गाईड्स'ची आ. मुनगंटीवारांनी थोपटली पाठ समाजसेवक व उद्योजिकांचे केले कौतुक भाजपा आत्मनिर्भर भारतचा उपक्रम शशी ठक्कर - आम...


  • ताडोब्यातील 'गाईड्स'ची आ. मुनगंटीवारांनी थोपटली पाठ
  • समाजसेवक व उद्योजिकांचे केले कौतुक
  • भाजपा आत्मनिर्भर भारतचा उपक्रम
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर भारतीय जनता पार्टी आत्मनिर्भर भारत तर्फे आगरझरी येथे श्री हनुमान मूर्ती पुनर्स्थापना, आरोग्य शिबीर व समाजातील आत्मनिर्भर व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन मंगळवार 29 मार्चला करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोब्यात (मोहूर्ली, आगरझरी) तैनात गाईड्सचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव केला.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपा नेते रामपालसिंह, आत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्ष किरण बुटले, भाजपा,भाजपा नेते, हनुमान काकडे, यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रारंभी आ मुनगंटीवार यांचे हस्ते श्री रामभक्त हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली व लगेच आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते मोहूर्ली येथे तैनात 28 तर आगरझरी येथील 20 गाईड्सचा सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने व्याघ्रप्रकल्पातील राज्यातील पहिली महिला गाईड शहनाज सुलेमान बेग यांचा समावेश होता.यावेळी अपघातग्रस्त प्राण्यांच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणारे प्यार फाउंडेशनचे संस्थापक इंजि. देवेंद्र रापेल्ली, सेवा निवृत्त सैनिक मनोज ठेंगणे यांनाही गौरविण्यात आले. याच वेळी बचत गटातील उद्योजक महिला, भजन मंडळी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी आ सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सत्कार हा कर्तृत्वाचा होत असतो. कर्तृत्वामुळेच व्यक्तीची ओळख असते. ही ओळख निर्माण करायला चंदनासम झिजावे लागते. आपले कर्तृत्व देशाला समर्पित असले पाहिजे. चांगली कृती करा, उद्योजक बना आत्मनिर्भर व्हा, इतरांच्या हाताला काम द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top