Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुर्गापूर परिसरात बिबट्याने 8 वर्षीय मुलाचा घेतला बळी !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुर्गापूर परिसरात बिबट्याने 8 वर्षीय मुलाचा घेतला बळी! आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता प्रतीक श्रावण कुमार/शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रत...

  • दुर्गापूर परिसरात बिबट्याने 8 वर्षीय मुलाचा घेतला बळी!
  • आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता प्रतीक
श्रावण कुमार/शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
18 फेब्रुवारीला दुर्गापुरातील 16 वर्षीय राज भडके या मुलाला बिबट्याने उचलून नेत त्याला ठार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापुरातील नेरी येथे 8 वर्षीय प्रतीक बावणे या मुलाला घरासमोरून बिबट्याने उचलून नेत ठार केले. 
सदर घटना रात्री 8 वाजेदरम्यान घडली असून भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी असलेल्या प्रतीक बावणे हा आठ वर्षीय मुलगा आपल्या आईचे वडील अर्थात आजोबा तेजराज मेश्राम (महाराज) ह्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता. बुधवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी तेजराज मेश्राम ह्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व कुटुंबास दुर्गापूर येथे आले. मेश्राम यांचे अंत्यसंस्कार झाले नसल्याने त्यांचे पार्थिव घरीच होते व आलेले सर्व नातेवाईक घरासमोर बसून होते, तर नात्यातल्या इतर समवयस्क मुलांसह प्रतिक घराच्या मागे खेळत होता. तितक्यात अचानक आलेल्या बिबट्याने झडप घालून प्रतीकच्या मानेला पकडुन बिबट्याने झुडपाच्या दिशेने धुम ठोकली.
अचानक झालेल्या घटनेने भेदरेल्या इतर मुलांनी घरच्यांना ओरडुन माहिती दिली व उपस्थितांनी प्रतीकचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला असता वेकोलीच्या नर्सरी जवळ क्षतविक्षत अवस्थेतील मृतदेह आढळून आला. बिबट्याने तेव्हढ्याच वेळात प्रतीकचे शीर अक्षरशः धडावेगळे केले होते

नागरिक वन विभागावर संतापले 
16 वर्षीय राज सुद्धा झाला होता. सदर परिसरातील हिंसक प्राण्यांच्या बंदोबस्त करावा अशीमागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आंदोलन केले होते मात्र पुन्हा घडलेल्या या प्रकाराने भटारकर ही चांगलेचं संतापले आहे. त्या बिबट्याला वनविभागाने ठार करावे अशी मागणी नितीन भटारकर यांनी केली आहे. जर परवानगी मिळत नसेल तर आम्ही गावकरी मिळून त्या बिबट्याला ठार करू अशी संतप्त प्रतिक्रिया भटारकर यांनी दिली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top