Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची युथ स्ट्रगल ग्रुपची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची युथ स्ट्रगल ग्रुपची मागणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत य...

  • शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची युथ स्ट्रगल ग्रुपची मागणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चांदसुर्ला (खैरगांव) येथे सहाय्यक शिक्षकांची 4 पदे मंजुर आहे. परंतू सप्टेंबर, 2021 मध्ये शिक्षकांच्या सेवानिवृत्तीने एक पद रिक्त झाले. यामुळे सद्या शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. 
सध्यास्थितीत शाळेत 1 ली ते 7 वी पर्यंत वर्ग असून पटसंख्या 51 व शिक्षक 3 आहेत. तिन शिक्षकांकडे 7 वर्गाचा भार असून शिक्षकांवर ज्ञानदानाचा मोठा भार पडत आहे. ही बाब नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर द्वारा संघटीत युथ स्ट्रगल ग्रुप, चांद्रसुर्ला (खै.) यांच्या सदस्यांनी गंभीर बाब लक्षात घेतली. शाळेत शिक्षकांची भरती करणे तसेच किचन शेडचे बांधकाम करणे आदी विषयाबाबतचे निवेदन पंचायत समिती सभापती तथा क्षेत्राच्या पं.स. सदस्या केमा रायपूरे यांना देण्यात आले. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रतिक मसराम, सचिव उमेश लाखे, सदस्य कुणाल क्षिरसागर, निखिलेश चाभरे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी पं.स. सभापती यांनी सकारात्मकता दर्शवित शिक्षकांची रिक्त पदे व किचन शेडचे बांधकाम करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top