Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेत केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेत केली आत्महत्या सौ, मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी भद्रावती - सासरच्या जाचाला कंटाळून ...

  • सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेत केली आत्महत्या
सौ, मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
भद्रावती -
सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भद्रावती तालुक्यात घडली आहे. तसमिया उर्फ झिनत असे मृतक महीलेचे नाव आहे. पती, सासू, सासरे यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, शेख अहमद शेख बब्बू शेख (48) रा. आसोले ले-ऊट आर्वी जि. वर्धा यांची मोठी मुलगी तसमिया उर्फ झिनत (22) हिचा विवाह मोहम्मद आमीर आदिल शेख रा. शिवाजी वार्ड भद्रावती जि, चंद्रपूर याच्याशी 2020 मध्ये झाला होता. काही दिवस सुखाचे गेले.
मात्र काही दिवस जाताच सासू, सासरे क्षुल्लक कारणावरून सतत तसमियाशी भांडण करत होते. त्यामुळे पती मोहम्मद आमीर हा तसमियाला मारहाण करायचा. तसमियाचा हा छळ सातत्याने सुरू होता. असा तिच्या वडिलांनी आरोप केला आहे. या कारणामुळे तिच्या आई वडिलांनी तिला आपल्या घरी सुद्धा आणले होते. परंतु काही दिवसांनी तिची समजूत घालून तिला सासरी पाठविले.
दि 30 मार्च रोजी दुपारच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु माझ्या मुलीची सासरच्या लोकांनीच हत्या केली असा आरोप मृतक तसमिया हिच्या वडिलांनी केला असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top