- राष्ट्रीय विकासात महिलांचे अमुल्य योगदान - अरुण धोटे
- रामबाग महिला समितीच्या वतीने महिलादिन उत्साहात संपन्न
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
रामबाग महिला समिती राजुराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महिलांसाठी संगीत खुर्ची व तांदूळ स्ट्रॉने ओढणे आशा विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये अरुणा कवठे, कविता कुचनवार, सपना गोरे, सौ. बर्डे इत्यादी महिलांनी यशसंपादन केले. सर्वांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अरुण धोटे होते तर प्रमुख पाहुणे जि. प. सदस्या मेघाताई नलगे, रिसर्च एक्सलंट अवॉर्ड विनर प्रा. डॉ. संजय गोरे, माजी नगरसेविका रोहिणीताई धोटे, मीनाताई लांडे, राजुरा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, रामनगर कॉलनी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुनमताई गिरसावळे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होत्या.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अरुण धोटे म्हणाले की राष्ट्रीय विकासात महिलांचे अमुल्य योगदान आहे. मुली या कधीच परक्या नसतात, त्या दोन कुटुंबांना जोडून ठेवतात. लग्नाअगोदर आई-वडिलांचे घर प्रकाशमान करतात लग्नाच्या नंतर सासरच्या घराला प्रकाशमान करतात. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या प्रसंगी प्रा. संजय गोरे, श्रीमती मेघाताई नलगे, रोहिणीताई धोटे, मीनाताई लांडे, संध्याताई चांदेकर, यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक पुनमताई गिरसावळे यांनी केले, संचालन एॅड. अंजलीताई गुंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षाताई बरडे यांनी मानले. कार्यक्रमाला रामनगर कॉलनी, अमराई वॉर्ड व इतर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.