Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नोकारी येथे जागतिक महिला दिन साजरा सरपंच सौ. संगिता मडावी यांनी दिली सर्व महिलांना शुभेच्छा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नोकारी येथे जागतिक महिला दिन साजरा सरपंच सौ. संगिता मडावी यांनी दिली सर्व महिलांना शुभेच्छा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदू...

  • नोकारी येथे जागतिक महिला दिन साजरा
  • सरपंच सौ. संगिता मडावी यांनी दिली सर्व महिलांना शुभेच्छा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महिला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणारी आई, बहिण,पत्नी, मुलगी आणि मैत्रिण अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभी राहते. देशातील असंख्य महिलांनी आपल्या स्वकृत्वाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. गावातील महिला सुद्धा आता स्वावलंबी होत आहे असे प्रतिपादन नोकारी पालगाव येथील महिला सरपंच सौ. संगिता मडावी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
नोकारी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नोकारी (पालगाव) येथील महिला सरपंच सौ. संगिता मडावी, सदस्य प्रीती चौधरी, सदस्य मनीषा कन्नूरवार, सदस्य सुरेखा बाई कुमरे, अविष्णाबाई पेंदोर, आशा वर्कर वंदनाताई आत्राम, अंगणवाडी मदतनीस चेतना करमनकर, अंगणवाडी सेविका येरोजवार सोबतच गावातील संपूर्ण महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top