Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात जन औषधीचे मोठे योगदान - डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात जन औषधीचे मोठे योगदान - डॉ. मंगेश गुलवाडे इंडीयन रेडक्रॉस सोसायटी तर्फे जन औषधी दिवस साजरा निःशुल्क रोगनिदान शि...

  • आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात जन औषधीचे मोठे योगदान - डॉ. मंगेश गुलवाडे
  • इंडीयन रेडक्रॉस सोसायटी तर्फे जन औषधी दिवस साजरा
  • निःशुल्क रोगनिदान शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
इंडीयन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूर तर्फे 6 मार्च रविवार ला जन औषधी दिवसाचे औचित्य साधून निःशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन रेडक्रॉस भवन येथे करण्यात आले होते यावेळी इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे प्रमुख म्हणून बोलत होते त्यांनी यावेळी जन औषधी मेडिकल स्टोअर्स च्या स्थापणे मुळे आरोग्य यंत्रणा  सक्षम झाली असून सामान्य नागरिकांना अल्प दरात औषधांचा पुरवठा होत असून नागरिकांची औषधा संबंधी  असणारी सर्वात मोठी समस्या दूर झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर शिबिराचा  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला त्यामध्ये रक्तदाब,मधुमेह,रोगनिदान तपासणी करण्यात आली यावेळी इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे माजी सचिव बि.एच. दाभेरे यांनी उपस्थितांना अरोग्या संबंधी घेण्यात येणाऱ्या काळजी संबंधी मार्गदर्शन केले सदर शिबिरात इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे उपसचिव डॉ.संजय घाटे,सभासद डॉ. बाल मुकुंद पालीवाल,डॉ.प्रफुल्ल भास्करवार, डॉ.अभय राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर आरोग्य कर्मचाऱ्यांन मध्ये स्मिता उपरे,पूनम तामगाडगे यांनी कार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात जन औषधी मेडिकल स्टोअर्स मधील कर्मचारी विकास गेडाम, पूर्वेश दडमवार,प्रभाकर माणूसमारे, अधिक्षक सुभाष मुरस्कर,आरिफ काजी यांनी अथक परिश्रम घेतले

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top