Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोलांडी येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोलांडी येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 5 व 6 एप्रिल ला विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन धनराजसिंह शेखावत - आम...

  • कोलांडी येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
  • 5 व 6 एप्रिल ला विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम संस्था आणि गौसेवा केंद्र, कोलांडी ता, जिवती येथे 6 एप्रिल ला माँ चामुंडा मातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत, यानिमित्ताने 5 व 6 एप्रिल ला  विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
5 एप्रिल ला सकाळी 10 वाजता गणपती पूजन,11 वाजता पुण्याह वाचन,12 वाजता मातृका पूजन, 3 वाजता पीठ पूजा हवन, 4 वाजता जलादिवस, 6 वाजता सामूहिक धानसाधना,7 वाजता दुर्गा सप्तशती पाठ होईल.
6 एप्रिल ला सकाळी 10 वाजता धात्यादिवास, 11 वाजता  फलादिवास, 12 वाजता पुण्या दिवास,1वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री योगेश सप्रे महाराज यांच्या हस्ते होणार आहेत, 3 वाजता पूर्णाहुती, आरती, 4 वाजता महाप्रसाद, 6 वाजता सामुहिक धानसाधना, 7वाजता सत्संग व दुर्गासप्तशती पाठ होईल. 2 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top