Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 12वी चा परीक्षेला सुरुवात कोरपना तालुक्यात 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उपकेंद्रावर 1676 विद्यार्थी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
12वी चा परीक्षेला सुरुवात कोरपना तालुक्यात 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उपकेंद्रावर 1676 विद्यार्थी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...

  • 12वी चा परीक्षेला सुरुवात
  • कोरपना तालुक्यात 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उपकेंद्रावर 1676 विद्यार्थी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला आज  4 मार्च पासून सुरुवात झाली. आज च्या इंग्रजी विषयाला सर्वाधिक विद्यार्थी बसले आहेत.
कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात परिरक्षक कार्यालय असून याअंतर्गत 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उप परीक्षा केंद्र निर्माण केले असून एकूण 1676 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सर्वाधिक विद्यार्थी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर परीक्षा केंद्रावर 494 आहे. मुख्य परीक्षा केंद्रमध्ये महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय कोरपना, प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय, नांदा, संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय, कोरपना चा समावेश आहे. परिरक्षक म्हणून कोरपना पंचायत समिती चे  शिक्षणविस्तार अधिकारी सचिन मालवी, सहाय्यक परिरक्षक म्हणून विषय तज्ज्ञ विकास  भंडारवार कार्यरत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top