Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नांना यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नांना यश राजुरा शहरातील नागरिकांना ५९३ घरकुल मंजूर विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - नगर प...

  • नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नांना यश
  • राजुरा शहरातील नागरिकांना ५९३ घरकुल मंजूर
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नगर परिषद राजुराद्वारे मागील पाच वर्षापासून लोकहिताच्या अनेक योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने सुरू आहे. शहरातील गोरगरीब, गरजू लाभार्थींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि त्यांचे सहकारी विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ५९३ लाभार्थी नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहेत. यात पहिल्या टप्प्यात १६० घरकुल व दुसऱ्या टप्प्यात ४३३ असे एकूण ५९३ घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. सदर अनुदान केंद्र शासन व राज्य शासनाचा सयुंक्त उपक्रमाद्वारे राबविले जाते. पात्र लाभार्थ्यांना एकूण रु - 2,50,000/- रक्कम अनुदान दिले जाते. मध्यंतरी काही कारणास्तव निधीची कमतरता झाल्याने कामे रखडली होती मात्र नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नाने खासदार बाळू धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे निधीची उपलब्धता झाली असून लवकरच सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. 
नगर परिषद राजूरा द्वारा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून या अंतर्गत रजिस्टर्ड जागेवर व गावठाण हद्दीतील लोकांना सुद्धा घरकुल मंजूर होणार आहेत. तर योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत परवडणारे घरकुल, किरायाने राहणारे व अतिक्रमण धारक नागरिकांना सुद्धा हक्काचे घर देण्याचे नियोजन चालू होणार आहे. या योजनेत सहभागी होऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top