Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बाबूपेठ येथील महात्मा फुले चौक ते जूनोना चौक पर्यंतच्या मार्गाची दूरुस्ती करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाबूपेठ येथील महात्मा फुले चौक ते जूनोना चौक पर्यंतच्या मार्गाची दूरुस्ती करा यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन शशी ठक्कर - ...

  • बाबूपेठ येथील महात्मा फुले चौक ते जूनोना चौक पर्यंतच्या मार्गाची दूरुस्ती करा
  • यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बाबूपेठ येथील महात्मा फुले चौक ते जूनोना चौक पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. त्यामूळे याची तात्काळ दखल घेत या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक रुपेश पांडेय, रमेश हुमने, प्रफुल डफ, शिवाशन धवले, रोहित यादव आदिंची उपस्थिती होती.
बाबूपेठ हा चंद्रपूर शहरातील प्रमूख भाग आहे. असे असले तरी या भागाकडे मनपाचे अपेक्षीत असे लक्ष नाही. महात्मा फुले चौक ते जुनोना चौकाकडे जाणाऱ्या मूख्य मार्गाची अक्षर:शा दुरावस्था झाली आहे. त्यातच पाईपलाइन टाकण्यासाठी सदर मार्ग खोदण्यात आल्याने येथे मोठ मोठे खड्डे पडले आहे. याच खड्यातील मार्गावरुन तारेवरची कसरत करत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. मार्ग पूर्णत: उखडला गेला असल्याने येथे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामूळे याची गांभीर्याने दखल घेऊन सदर मार्गाची तात्काळ दूरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून महानगर पालिका आयुक्त विपीन पालिवाल यांना केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top