Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "आता राबवू जलनीती, नको काळाची भीती" इनरव्हील क्लब ऑफ राजूराच्या सदस्यांनी दिली कळमना गावाला भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"आता राबवू जलनीती, नको काळाची भीती" इनरव्हील क्लब ऑफ राजूराच्या सदस्यांनी दिली कळमना गावाला भेट घेतला वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच ...

  • "आता राबवू जलनीती, नको काळाची भीती"
  • इनरव्हील क्लब ऑफ राजूराच्या सदस्यांनी दिली कळमना गावाला भेट
  • घेतला वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच "पाणी जिरवा पाणी साठवा" उपक्रम
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
"आता राबवू जलनीती, नको काळाची भीती" या उक्तीप्रमाणे इनरव्हील क्लब ऑफ राजूराच्या सदस्यांनी कळमना गावाला भेट दिली. आणि "पाणी जिरवा पाणी साठवा" हा उपक्रम घेतला. क्लबच्या सदस्यांनी कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या सहकार्याने वॉटर हार्वेस्टिंग बद्द्ल सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. सरपंच वाढई यांनी कळमना या गावात पुढाकार घेऊन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम सुरू केला आहे. कळमना या गावात वॉटर हार्वेस्टिंग चे 80% काम पूर्ण झालेले आहे. त्या निमित्याने इनरव्हिल क्लब ऑफ राजूराच्या अध्यक्ष सौ. स्वरूपा झंवर यांच्या हस्ते सरपंच नंदकिशोर वाढई सरांचा सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविका मध्ये आम्ही आमच्या घरी सुद्धा ही योजना राबवू असे आश्वासन इनरव्हिल क्लब ऑफ राजूराया अध्यक्ष सौ स्वरूपा झंवर यांनी दिले.
यावेळी स्वागत गीत प्राची चिल्लावार यांनी गायले, संचालन शुभांगी वाटेकर यांनी तर आभार राधिका धनपावडे यांनी मानले. याप्रसंगी शुभांगी वाटेकर, कल्याणी गुंडावर, नेहा चिल्लावार, प्राची चिल्लावार, स्मिता बोनगिरवार, आसावरी बोनगिरवार, अर्चना शिंदे, रोशनी झंवर, राधिका धनपावडे,  कळमनाचे जेष्ठ नागरिक महादेव पिंगे, दत्ता पिंपळशेंडे, पुंडलिक पिंगे, धोंडुजी सुमटकर, नामदेव विद्दे, मारोती मुसळे, मनोहर कावडे अतुल अतकारे, संदीप गिरसावळे, शशिकला वाढई, शकुंतला पिंगे, बयाबाई ताजने, विठ्ठल नागोसे यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top