Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रात्री भर चौकातील दुकानाचे कुलूप तोडून चोरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रात्री भर चौकातील दुकानाचे कुलूप तोडून चोरी नांदा फाटा येथील दुकानातून हजारोच्या माल लंपास जागरूक लोकांनी पकडले चोरांना ; चोरीचा माल हस्तगत ...

  • रात्री भर चौकातील दुकानाचे कुलूप तोडून चोरी
  • नांदा फाटा येथील दुकानातून हजारोच्या माल लंपास
  • जागरूक लोकांनी पकडले चोरांना ; चोरीचा माल हस्तगत 
  • नागरिकांत व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातारण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट समोर नांदाफाटा येथील भर चौकात असलेल्या चौधरी इलेक्ट्रिक & जनरल स्टोर्सच्या दुकानातील शटर चे कुलुप तोडून 20 ते 25 हजाराच्या मालावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली. अल्ट्राटेकच्या सुरक्षागार्ड असलेल्या मुख्य गेट समोरचे व गावातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नांदा फाटा चौकातील दुकानाचा कुलूप तोडल्याने येथील व्यापारी लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.
शनिवारी रोजच्या वेळेवर दुकानदार फुलचंद चौधरी आपली दुकान खोलयला आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जवळ पास असलेल्या लोकांना व आपल्या नातेवाईकांना चोरीची घटना झाल्याचे सांगितले. रात्री झालेल्या घटनेत चोरीचा माल नेताना रात्री चौकातच झोपलेल्या काही लोकांनी चोरांना बघितले होते. चोरीची घटना झाल्याचे ऐकून त्यांनी रात्रीला चोरी करणाऱ्या इसमाची नावे आणि ओळख सांगितली. चोरट्यांची नावे माहीत होताच काही जागरूक लोकांनी लगेच त्यांच्या घरी जाऊन चोरी करणाऱ्या पैकी एक किशोर वयीन मुलाला पकडले आणि त्यांनी सांगितल्या घरी जाऊन घरातून चोरी झालेल्या तीस हजार रुपये किमतीचे कॉपर केबलचे बंडल ताब्यात घेतले. चोर सापडल्याची वार्ता ऐकून लोकांनी चौकातील दुकानात एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच नांदा फाटा येथील पोलिस हवालदार नागोबा बुर्हान यांना वेळेवर पोहचून चोराला आपल्या ताब्यात घेतले. गडचांदुर पोस्टे ला घटनेचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस हव. नागोबा बुरहान करीत आहे. पकडल्या गेलेला एक आरोपी नाबालीक असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या  सोबत असलेला दुसरा आरोपी अजून पर्यंत फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नांदा फाटा येथील अल्ट्राटेकच्या सुरक्षा रक्षक असलेल्या मुख्य गेट समोर चौकात असलेल्या दुकानाचे कुलूप आरीने कापून चोरी करणाऱ्या चोरांचे धाडस पाहून पोलीस उपमुख्यालय असलेल्या नांदाफाटा येथील व्यापाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. जर चौकातील दुकाने सुरक्षित नाही तर गल्ली कोपऱ्यात असणाऱ्या दुकानाचे संरक्षण कसे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील लोकांचे सुरक्षा साठी  पोलिस प्रशासनाने चौकात लावलेले कॅमेरे सुद्धा काढण्यात आल्याचे येथील प्रतिष्ठित व्यापारी वेकंना रामदेनी यांनी सांगितले आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवून चौका-चौकात कॅमेरे लाऊन गावातील सुरक्षा व्यवस्था सुदृढ करण्याची गरज आहे. दारू सुरू झाल्यापासून अनेक लहान मोठी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. तरी पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी येथील अनेक व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top