आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२५) -
राजुरा तालुक्यातील भेंडाळा-चिचबोडी रस्त्यावर भेंडाळा मध्यम प्रकल्पाच्या वेस्ट वेअर साठी नाला वळवून रस्ता बांधण्यात आला होता. मात्र २३ जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसात हा रस्ता पूर्णतः वाहून गेला, त्यामुळे नागरिक, विद्यार्थी व शेतकरी यांची मोठी गैरसोय झाली.
पांढरपौनी येथे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून रामचंद्र मडावी यांचे घर पाण्यामुळे कोसळले. नाईकनगर परिसरात बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी गावात घुसल्याने अनेक घरात पाणी भरले. या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्वरित उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.