सरकारला झोपेतून उठवणारा शेतकरी मोर्चा!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिवती तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ जुलै २०२५) -
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालय हा मोर्चा धडक व शांततेच्या मार्गाने पार पडला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- तहसील कार्यालयाकडून नोटीस देणे थांबवावे,
- तलाठी रेकॉर्डनुसार नावे असलेल्या शेतकऱ्यांचे पट्टे कायम करावेत,
- २०२३-२४-२५ या वर्षांच्या नुकसानीची भरपाई व पिकविमा रक्कम तत्काळ द्यावी,
- सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा,
- ऑफलाइन सातबारावरून फार्मर आयडी व कृषी सौर पंप देण्यात यावेत.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी सांगितले की, ३५ वर्षांपासून अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच या आंदोलनामागची भूमिका आहे. या मोर्चात स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम, युवाध्यक्ष विशाल राठोड, देविदास वारे, रवींद्र राठोड, बालाजी पाचंगे, बालाजी कांबळे, बळीराम मस्के, तुकाराम सिडाम, प्रविण पवार, दत्ता राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.