Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नगर पंचायतच्या निवडणुकी करीता भाजपा, शेतकरी संघटना व कोरपना विकास परिवर्तन आघाडी युतीची संयुक्त बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगर पंचायतच्या निवडणुकी करीता भाजपा, शेतकरी संघटना व कोरपना विकास परिवर्तन आघाडी युतीची संयुक्त बैठक संपन्न स्व. अशोक डोहे यांची स्मृती दिना...

  • नगर पंचायतच्या निवडणुकी करीता भाजपा, शेतकरी संघटना व कोरपना विकास परिवर्तन आघाडी युतीची संयुक्त बैठक संपन्न
  • स्व. अशोक डोहे यांची स्मृती दिनानिमित्य कार्यक्रम सम्पन्न 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गड़चांदूर -
कोरपना येथील रहिवासी दिनदुबळ्यांचे कैवारी, संघर्षाशील नेतृत्व स्वर्गीय अशोकराव डोहे यांच्या तृतीय स्मृती दिनाप्रित्यर्थ त्यांच्या जीवनावर मान्यवरांनी प्रकाश टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या व आदरांजली वाहिली. या नंतर कोरपना नगर पंचायतच्या येत्या १८ जानेवारी ला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या नियोजना बाबत बैठक करण्यात आली.
या वेळी भाजपाजिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री नामदेवराव डाहूले, शेतकरी संघटनेचे नेते रमाकांत मालेकर, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अबिद अली यांनी सभेला नियोजना बाबत माहिती दिली व आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या तिन्हीही जागा जिंकण्याच्या विश्वास असल्याचा दावा केला. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी व या नगर पंचायत वर वर्षोनुवर्षे असलेल्या सत्ता हुसकावून आपल्या युतीचा झेंडा फडकवावा असे सुचविले.
याप्रसंगी भाजप चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री नामदेवराव डाहूले, जिल्हा किसान आघाडी चे राजू घरोटे, तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, राकाँ पक्ष्याचे नेते सय्यद आबीद अली, शेतकरी संघटना जिल्हाधक्ष अरुण पा नवले, रमाकांत मालेकर, राजुरा क्षेत्राचे विस्तारक सतीश उपलेंचवार, निलेश ताजने, माजी सभापती संजय मुसळे, नगरसेवक अरविंद डोहे, माजी नगरसेवक अमोल आसेकर, अँड. श्रीनिवास मुसळे, किशोर बावणे, विजय मसे, रमेश पा. मालेकर, अरुण मडावी, विजय पानघाटे, सुनिल देरकर, विजय रणदिवे, आशिष ताजने, पुरुषोत्तम भोंगळे, पद्माकर धगडी, ओम पवार, रामसेवक मोरे, सोहेल अली, मोहब्बत खान सैयद नदीम, सैय्यद शारीक, सुभाष आत्राम, जिल्हा महिला महामंत्री सौ. विजयालक्ष्मी डोहे, जिल्हा महिला सचिव सौ. इंदिराताई कोल्हे, सौ जयाताई धारनकर, सौ. जोत्सना वैरागडे, सौ. वर्षा लांडगे व सर्व भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना पक्ष्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सह मान्यवर उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top