Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथील नाली बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर येथील नाली बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - गडचा...

  • गडचांदूर येथील नाली बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप
  • चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
गडचांदुर नगर परिषद क्षेत्रात बाजार क्षेत्रातीलतील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात नाली चे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी नप ने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार योग्य काम होतांना दिसून येत नसल्याने येथील भाजयुमो चे तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. गडचांदूर येथील विकास कामात होत असलेली दिरंगाई, भ्रष्टाचार व निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याने नागरिक व व्यापारी वर्ग सुद्धा त्रस्त झाले आहे. नगरसेवक किंवा नप चे अभियंता या कडे फिरकून सुद्धा पाहत नसल्याने दर्जा खालावलेला आहे. ठरवून दिलेल्या मानकानुसार काम होत नसल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यासंबंधाचे पत्र नप मुख्याधिकारी यांना सुद्धा पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
गडचांदूर ते घोडामगुडा रस्त्याचे डांबरीकरण साठी एक वर्ष अगोदर भूमिपूजन झाले परंतु एक वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा फक्त खडीकरण झाले. डांबरीकरण केव्हा होणार याबाबत जनतेकडून सारखे प्रश्न विचारले जात आहेत. गडचांदुर येथील नगरपरिषद मध्ये सावळा गोंधळ सुरू असून नगरसेवक यांचाही कर्मचाऱ्यांवर पाहिजे तेवढा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे नप नाली कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा मोठा आरोप गडचांदुर येथील भाजयुमो चे तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी गडचांदुर शहरात होत असलेल्या विकास कामाची गुणवत्तेवर तपासून दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top