Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार किशोर जोरगेवार यांनी वीज कामगारांसोबत साजरा केला नवं वर्षाचा पहिला दिवस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार किशोर जोरगेवार यांनी वीज कामगारांसोबत साजरा केला नवं वर्षाचा पहिला दिवस शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - नववर्षाची सुरवात ...

  • आमदार किशोर जोरगेवार यांनी वीज कामगारांसोबत साजरा केला नवं वर्षाचा पहिला दिवस
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
नववर्षाची सुरवात आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएस येथील वीज कामगारांसोबत केली. यासाठी आ. जोरगेवार यांनी आज सकाळी सिएसटीपीएस येथे प्रत्येक्ष जावून कामगारांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या परिश्रमाचे कौतूक करत त्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा शहर संघटक कलाकार मल्लारप, यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे  कार्याध्यक्ष प्रकाश पडाल, शहर संघटक पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विलास वनकर, विश्वजित शाहा, बबलू मेश्राम, नितीन शाहा, मंगेश अहिरकर, गौरव जोरगेवार, शकिल शेख आदिंची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांनी नव वर्षाची सुरवात कामगारांसोबत केली. सिएसटीपीएस येथील कामगार महाराष्ट्र प्रकाशमय ठेवण्याचे काम करत आहे. येथील कामागरांच्या श्रमावरच सर्वाधीक विद्युत निर्माता करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाची ओळख निर्माण झाली असून ती कायम राहिली आहे. अशा कामगारांसोबत नव वर्षाची सुरवात करतांना आनंद होत असल्याचे यावेळी ते म्हणाले, नव वर्षाचा पहिला दिवस हा कामगारासोबत साजरा करत असतांना येथील कामगारांच्या अडचणींचीही जाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, औष्णिक विद्युत निर्मीती प्रकल्पात काम करत असतांना कामगारांना येणा-या अडचणी बाबतही त्यांनी या प्रसंगी माहिती जाणून घेतली. येथे काम करणा-या कामगार वर्गाला सन्मानजनक वागणूक दिल्या गेली पाहिजे, पूर्ण सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिल्या गेली पाहिजे अशा सुचनाही यावेळी उपस्थित अधिका-र्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top