Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी कॉलेज येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री शिवाजी कॉलेज येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञ...
श्री शिवाजी कॉलेज येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. अविनाश जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून डॉ. इसादास भडके, तर, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य, डॉ. एस. एम. वारकड, डॉ. आर.आर. खेराणी, प्रा. व्ही. के. शंभरकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमातून डॉ. भडके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि त्यांनी चालविलेल्या चळवळी, त्यांचे ग्रंथलेखन यातून व्यक्त केलेले विचार आणि त्यातून व्यक्त होणारी राष्ट्रीयता मांडली. 
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा. शंभरकर यांनी मांडले. संचालन, डॉ. संजय लाटेलवार, यांनी केले तर आभार डॉ. सारिका साबळे, यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. वारकड यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, डॉ. लाटेलवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वनिता वंजारी, डॉ. वर्षा डांगे, डॉ. सारिका साबळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील, सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top