- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीच्या 22 डिसेंबरच्या बेमुदत धरणे आंदोलनात आ. जयंत आसगावकर आझाद मैदानात शिक्षकांच्या बरोबर बसणार - खंडेराव जगदाळे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीच्या 22 डिसेंबर 2021 पासून प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे याकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार असून या आंदोलनात शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे 22 डिसेंबर पासून शिक्षकांच्या बरोबर बेमुदत धरणे आंदोलनात स्वतः बसणार आहेत. कृती समितीच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली होती 1 वर्ष पूर्ण झाले जे आश्वासन मिळाले होते. त्याची पूर्तता झाली नाही, याची आठवण करून दिली गेली. प्रचलित अनुदान हा आमचा हक्क आहे, असे असताना शासन चालढकल करीत असून आम्हाला न्याय मिळायचा असेल तर आपण ही आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंती केली, त्यानुसार मा आमदार जयंत आसगावकर यांनी विनंती मान्य करून 22 डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनात बसण्याचे मान्य केले. याप्रमाणे इतर विभागातील सर्व शिक्षक आमदार यांनी ही सक्रिय सहभागी व्हावे ही विनंती सर्व राज्यातील विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने करीत आहोत जिह्मयातील सर्व विनाअनुदानित शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी आवर्जुन उपस्तिथ राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रमुख अनिल मुसळे, नंदकिशोर धानोरकर राजू पारोधे रमेश पायपरे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.