आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
चंद्रपूर / विरूर स्टेशन (दि. ०९ ऑक्टोबर २०२६) -
बल्लारपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जीवन विलास झरेकर (वय १२, रा. खांबाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवनची प्रकृती ठीक नसल्याने त्याचे वडील विलास झरेकर यांनी त्याला चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. उपचारानंतर त्यांनी जीवनला सन्मित्र सैनिक शाळेत सोडले आणि ते खांबाडा येथे परतले. काही वेळाने शाळेतील शिक्षकाचा फोन आला. जीवनची प्रकृती बरी नसल्याचे समजताच वडील शाळेकडे रवाना झाले. मात्र, जीवनला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर जीवनचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले.
या घटनेबाबत कुटुंबीयांनी मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळा व्यवस्थापनाकडून घटनेची पुरेशी माहिती मिळत नसल्याचा आरोप वडील विलास झरेकर यांनी केला असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप शाळा व्यवस्थापनाचे अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. तसेच पोलिसांकडूनही घटनेबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे वैद्यकीय कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर येथील रामनगर पोलीस करीत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत शवविच्छेदन अहवाल आणि अधिकृत तपासातून स्पष्टता येण्याची प्रतीक्षा आहे.
#ChandrapurNews #Chandrapur #Rajura #VirurStation #Khabada #SanmitraSainikSchool #JeevanZharekar #ChandrapurPolice #RamNagarPolice #StudentDeathNews #MaharashtraNews #चंद्रपूरबातमी #राजुरा #विरूरस्टेशन #जीवनझरेकर #सन्मित्रसैनिकशाळा #चंद्रपूरन्यूज #आमचाविदर्भ

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.