Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना 4, काँग्रेस 3 व शेतकरी संघटना 1 उमेदवार विजयी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना 4, काँग्रेस 3 व शेतकरी संघटना 1 उमेदवार विजयी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यात आठ ग...

  • ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना 4, काँग्रेस 3 व शेतकरी संघटना 1 उमेदवार विजयी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यात आठ ग्रामपंचायत जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकाचे निकाल आज घोषित झाले असून शिवसेनेचे सास्ती येथे दोन, रामपूर येथे एक व हरदोना येथे एक असे चार उमेदवार विजयी झाले. विरूर स्टेशन, सिंधी आणि सुमठाणा येथे प्रत्येकी एका जागेवर कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले. विरुर स्टेशन येथे शेतकरी संघटनेची महिला अविरोध विजयी झाली.
सास्ती येथे शिवसेनेचे मुरारी बुगावार व पोर्णिमा भटारकर, हरदोना येथे किसन टेकाम आणि रामपूर येथे लता डाखरे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. कॉँग्रेस पक्षाचे विरुर स्टेशन येथे रविंद्र कुळमेथे, सिंधी येथे किशोर कोडापे आणि सुमठाणा येथे अरुण डंभारे विजयी झाले. विरूर येथेच शेतकरी संघटनेच्या मल्लुबाई मल्लेश मालपेल्ली या अविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top