Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - नजीकच्या बिबी येथील शेतशिवारात १५ नोव्हेंबरला कवडू लक्ष्मण पा...

  • सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
नजीकच्या बिबी येथील शेतशिवारात १५ नोव्हेंबरला कवडू लक्ष्मण पावडे (६९) या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात शेतीकाम करताना सर्पदंश झाला होता.
१५ नोव्हेंबरला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले होते. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात त्यांना स्थलांतरित करण्यात आले. दहा दिवस उपचार करून अखेर बुधवारी त्यांचा सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला.
घरचा कर्तामाणूस गमावल्याने पावडे कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top