Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नप निवडणूकी संदर्भात वार्ड प्रारूप रचना व प्रभाग निहाय नगर सेवकांची संख्या बाबतची माहिती द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नप निवडणूकी संदर्भात वार्ड प्रारूप रचना व प्रभाग निहाय नगर सेवकांची संख्या याबाबतची माहिती द्या भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी न...
नप निवडणूकी संदर्भात वार्ड प्रारूप रचना व प्रभाग निहाय नगर सेवकांची संख्या याबाबतची माहिती द्या
भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना निवेदनद्वारे केली मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आगामी राजुरा नगर परिषद निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोग यांनी वार्ड प्रारूप रचना निश्चित करण्याचे व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वार्ड निहाय नगर सेवकांची संख्या निश्चित करण्याबाबत निर्देश दिले आहेत,याबाबतची माहिती अवगत करण्याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी राजुराच्या शिष्टमंडळाद्वारे राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन याबाबतची माहिती अवगत केली व सविस्तर चर्चा करून भाजपा राजुरा तर्फे निवेदन देण्यात आले.
सदर निर्देशानुसार राजुरा नगर परिषदने वार्ड प्रारूप रचना तयार केलेली आहे,नागरिकांच्या माहिती सदर रचनेचे स्वरूप व त्याकरिता लावण्यात आलेले निकष याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळामध्ये भाजपचे जेष्ठ नेते अरुण मस्की, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, नगर सेवक राजेंद्र डोहे, नगर सेविका उज्वला जयपूरकर, भाजपच्या उपाध्यक्षा सौ स्वाती देशपांडे, भाजपचे तालुका महामंत्री दिलीप वांढरे, महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपचे नेते मिलिंद देशकर, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, अनिल खणके, गणेश रेकलवार, श्रीनिवास पांजा, विलास खिरटकर, महिला आघाडी नेत्या सौ शांता कदम, सचिन बैस, जनार्धन निकोडे, संजय समर्थ, कैलास कार्लेकर, पराग दातारकर आदी भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top