Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जीएनआर कंपनी कामगारांना दिवाळी बोनस देण्यास तयार ; युवक काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावा या मागणीसाठी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे आणि शहराध्...











































आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावा या मागणीसाठी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे आणि शहराध्यक्ष अशोक राव यांच्या नेतृत्वाखाली जीएनआर कंपनी साखरी येथे काम बंद आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मान्य केले आहे. तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 
या प्रसंगी शेहबाज शेख, शैलेश गावंडे, सदानंद परचाके, रितेश दुर्गे, संतोष गोडसेेलवार, प्रकाश उईके, निलेश काटवले, सुधीर करमनकर, सुभाष जुनघरे, सुरेंद्र कवलकर, अमोल लोणारे, दिपक उरकुडे, फिरोज शेख, मेघराज लांजेवार, सुनील खुजे, मंगेश मिलमिले, प्रकाश झुंगरे, मोतीराम झुंगरे, सागर खुजे, अमोल अडबाले, सागर जेरपोत, शालिक मालेकर, गंगाधर धवने, प्रदीप गावंडे, प्रशांत गावंडे, गणेश मांडवकर, दिलीप काटवले, विलास चुदरी, राहुल उरकुडे, अरुण येमुलवार, किशोर कोवे, मोहिन खान, अंजना तांदुलवार यासह मोठ्या संख्येने कामगार व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top