बल्लारपूर -
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शहरातील मोठ्या चर्च जवळील बँक ऑफ महाराष्ट्र समोर उभ्या असलेल्या मारुती ब्रेझा कार क्रमांक PB65 AP5963 ला अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. आग इतकी भीषण होती कि संपूर्ण कार क्षणाधार्थ कार जळून खाक झाली. सुदैवाने कारमध्ये व सभोवताली कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या चर्च जवळील बँक ऑफ महाराष्ट्र समोर उभ्या असलेल्या मारुती ब्रेझा कार मधून धूर निघत असल्याचे काही लोकांनी बघितले. जागरूक नागरिकांनी याबाबत पोलीस व अग्निशमन विभागाला माहिती दिली. दोन्ही विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर तर पोलिसांनी जीवितहानी तसेच परिसरातील इतर वाहन सुरक्षित ठेवण्यास मोठे यश मिळविले. दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्य-कर्तृत्वाचे नागरिकांनी कौतुक केले.
सदर कार गिरीश माकोडे यांची असल्याची माहिती मिळाली असून दिवाळीच्या सुटीनिमित्य ते शहरात आल्याचे समजते. सदर आग फटाक्याने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.