Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पत्नीच्या प्रियकराने काढला पतीचा काटा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन तासात हत्या गुंतागुंती प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी  चंद्रपूर - 16 ऑक्टोरला पड...
  • तीन तासात हत्या गुंतागुंती प्रकरणाचा उलगडा
  • स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
16 ऑक्टोरला पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनोळखी इसमाचे प्रेत आढळले होते, या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटना स्थळी भेट दिली. घटनास्थळी कुठला ही पुरावा व शस्त्र आढळुन आले नसल्याने सदर तपास आव्हानात्मक असल्याने पोलीस अधीक्षक साळवे यांनी तपासाची धुरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचेकडे सोपविली. 
मृतकाचे वय 40 ते 45 वर्ष वयोगटातील होते, सदर मृतकाचा फोटो शहरातील दुर्गापूर, रयतवारी, अष्टभुजा व प्रकाश नगर परिसरातील नागरिकांना दाखवीत ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता मृतक हा प्रकाश नगर परिसरात राहणारा होता, त्याचे नाव राजू अनंत मलिक असे निष्पन्न झाले.
त्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता मृतकाच्या पत्नीचे व जितेंद्रसिंग भंडारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती मिळाली.
तसेच मृतक व त्याच्या पत्नीशी भंडारी हा सतत संपर्कात होता. या माहिती वरून पोलिसांनी जितेंद्र भंडारी याला दुर्गापुर येथून ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू केली. आधी भंडारी हा उडवा उडवी ची उत्तरे देत होता मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने मृतकाच्या पत्नी सोबत मागील 5 वर्षांपासून
प्रेम संबंध असल्याची कबुली दिली.
मृतकाची पत्नी मागील वर्षभरापासून आपल्या माहेरी छत्तीसगड येथे गेली असून भंडारी यांच्या प्रेमात राजू अडसर झाला होता. त्याला ठार मारण्याचा कट जितेंद्र ने रचला व त्यानुसार विजयादशमीच्या  रात्री 7 वाजता मृतक राजूला जितेंद्र ने सिनर्जी वर्ल्ड परिसरातील निर्जन परिसरात नेत त्याला दारू पाजली व राजूच्या डोक्यावर जितेंद्र ने वार करत त्याला ठार केले.
पोलिसांनी जितेंद्र ला हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. अवघ्या 3 तासात स्थानिक गुन्हेशाखेने हत्येच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणा चा छडा लावला. सदर यशस्वी कामगिरी पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, सचिन गदादे, अतुल कावळे यांचे सह पो.हवा संजय आतकुलवार, स्वामी चालेकर, पंडीत वन्हऱ्हाडे, ना.पो.कॉ. गजानन नागरे, पो.शि. प्रशांत नागोसे, अमोल धंदरे, संदीप मुळे, रविंद्र पंधरे, नितीन रायपूरे, कुंदसिंग बावरी, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, गणेश मोहूर्ले, दिपक डोंगरे, प्रशांत धुडगंडे, चानापोशि दिनेश अराडे यांनी केली.








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top