Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रा ला आमदार बंटी (किर्तीकुमार) भांगडीया यांनी दिली भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निलंबन व वैद्यकीय परवाना रद्द  करण्याची कार्यवाही मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चिमूर - दि.१४ ऑक्टोबर ...
  • दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निलंबन व वैद्यकीय परवाना रद्द  करण्याची कार्यवाही
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमूर -
दि.१४ ऑक्टोबर ला नेरी येथील संजय शिवा गराटे हा 35 वर्षीय तरुण प्रकृती अस्वस्थ असल्याने सकाळी ७ वा. प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला असता तिथे कुणीही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. परिचारिकेने तपासून डॉक्टरांना बोलावतो म्हणत टाईमपास केला. परंतु वेळ अधिक झाल्याने डॉक्टर दवाखान्यात पोहचताच मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या कामात हयगय केल्यामुळे तरुणाला प्राण गमवावा लागला. या घटनेची माहिती सकाळी ८.३० वाजता नेरी येथील भाजपा कार्यकर्ते यांचे कडून माहिती होताच चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क साधून तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली व लवकरात लवकर नेरी PHC ला भेट देऊन DHO यांचे सोबत ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रश्नोत्तर करून त्यांचे वैद्यकीय परवाने रद्द करण्यात यावे असा आदेश दिला. त्याचप्रमाणे संपूर्ण सोयी, सुविधा व कामात हयगय दिसून येता संपूर्ण कर्मचारी यांची वार्षिक वेतनवाढ थांबवण्याची कार्यवाही केली.
मृत व्यक्तीच्या घरी बंटी भांगडीया आणि भाजपा पधाधिकाऱ्यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वना केले व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शक्य मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले. 
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर, महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी वसंत वारजूकर, श्याम हटवादे, चंद्रपूर जिल्हा भाजपा कार्यकारिणीचे सचिव राजु देवतळे, चिमूर तालुका भाजपा महिला अध्यक्षा सौ. माया नन्नावरे, युमो भाजपा चंद्रपूर चे सचिव संदीप पिसे, एकनाथ थुटे, जिप सदस्य मनोज मामीडवार, नरेंद्र पंधरे, संदेश पंधरे, पिंटू खाटीक, सूरज नरुले, कनैया सिंग भौन्ड, हर्षल कामडी, श्रीकांत कामडी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top