- अरविंद नगर येथील जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक अभ्यासिकेचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन
चंद्रपूर -
जेष्ठांच्या अनुभवातून आलेले विचार हे सक्षम व प्रगत समाजासाठी पोषक आहे. त्यांच्या विचारांची आणि सुचनांची समाजाने दखल घेणे आवश्यक आहे. निर्माण होत असलेल्या या जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक अभ्यासिकेतून जेष्ठांनीही समाजाला मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जेष्ठ नागरिकांच्या मागणी नंतर अरविंद नगर येथे स्थानिक विकास निधीतून जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक उपयोगा करिता 25 लक्ष रुपयांची अभ्यासिका मंजूर करण्यात आली आहे. दस-याच्या दिवशी या अभ्यासिकेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी चंद्रपूर महागनर पालिकेचे स्थायी समिती सभापती संदिप आवारी, मनपा गटनेता डाॅ. सुरेश महाकुलकर, माजी नगर सेवक अविनाश पुट्टेवार, यांच्यासह पसायदान जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गुंडावार, उपाध्यक्ष कुसन नागोशे, सचिव दादाजी नंदनवार, कोषाध्यक्ष दिपक तम्मीवार, स्विकृत सदस्य विजय कोंकमवार यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, कोरोना काळात आमदारांच्या विकासनिधीत कपात करण्यात आली. असे असतांनाही आपण चंद्रपूरच्या सर्वसमावेशक विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला. यातून शहरी भागासह ग्राणिम भागातील मुलभूत सोयी - सूविधांवर काम होत आहे. हे सर्व कामे होत असतांना जेष्ठ नागरिक हा सुध्दा माझ्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या विविध संस्थासाठी भरिव काम करण्याचा माझा मानस आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.