Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बिबी येथील पुरुष मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यातील 168 स्पर्धकांचा सहभाग आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी नांदाफाटा - बिबी येथील म...
  • जिल्ह्यातील 168 स्पर्धकांचा सहभाग
  • आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नांदाफाटा -
बिबी येथील माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी व आशिष देरकर मित्रमंडळ बिबीच्या संयुक्त विद्यमानाने 16 ऑक्टोबरला बिबी येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन पार पडले. 
पुरुष मॅरेथॉन स्पर्धा अ व ब आशा दोन गटात संपन्न झाली. स्पर्धेला सकाळी 8 वाजता सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरातील 168 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये 'अ' गटातून प्रथम क्रमांक ऋषिकेश सोनवने (चंद्रपूर), द्वितीय ओम ढवळे (चंद्रपूर) व तृतीय क्र-मांक मोहीत उरकुंडे (चंद्रपूर), यांनी पटकावला. तर 'ब' गटामध्ये प्रथम महेश वाढई (चंद्रपूर), द्वितीय रितीश सिंग ठाकुर (चंद्रपूर), तर तृतीय प्रणील लांडे (चंद्रपूर) यांनी प्राप्त केला. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणात देण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. आशिष देरकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, डॉ. स्वप्नेश चांदेकर व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामकांत पिंपळकर, विठ्ठल टोंगे, नरेंद्र अल्ली, गुणू काकडे, सतीश जमदाडे, नितेश शेंडे, कल्पतरू कन्नाके, अखिल अतकारे, स्वप्नील मुंगूल, संतोष झुरमुरे, आकाश कोडापे, सचिन मडावी, अमोल आत्राम, सोमेश्वर आत्राम, लोकेश कोडापे, संतोष मडकाम व राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी च्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top