- शेतात एकटे न जाण्याचे दिवंडी लावून आवाहन
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील भोयगाव, भारोसा, इरई भागातील परिसरात वाघाच्या पंज्यांचे निशाण दिसल्याने गावातील नागरिकात एकच खळबळ उडाली आहे. शेतात जाताना वाघाचे पाऊल खुणा दिसल्याने गावातील शेतकऱ्यात व नागरिकात दहशतीचे वातावरण आहे. काही लोकांनी प्रत्यक्ष वाघाला बघितल्याची गवाही दिली आहे.
दोन वर्षापूर्वी भरोसा, भोयेगाव, पालगाव मार्गाने अल्ट्राटेक सिमेंट, आवारपुर कॉलोनी परिसरात वाघ आल्याने एकच खळबळ उडाली होती. वन विभागाला तब्बल 15-20 दिवसांनी त्याला पकडण्यात यश आले होते. गडचांदूर येथील वन विभाग चे अधिकारी यांनी गावात दिवंडी देऊन शेतकऱ्यांना संध्याकाळी 4 च्या नंतर व सकाळी 9 च्या अगोदर एकटे शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आहे. अतिशय आवश्यक असल्यास समूहात बाहेर जाण्यास सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी गावात मोठी दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या जीवसोबताच आपल्या जनावरांचीपण चिंता लागली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात एकटे जाण्यास भीती निर्माण झाली आहे. भरोसा येथील सरपंच देवराव निमकर याचेशी या संदर्भात माहिती दिली आहे की वाघ आल्याची माहिती मिळताच गडचांदूर येथील वन विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी गावातच ठीया मांडून बसले आहे. वाघाचे शोध घेण्याकरिता भारोसा गावालगतच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. यावेळी गावचे सरपंच देवराव निमकर, पोलिस पाटील सतीश गेडाम यांनी लोकांना सावध राहण्याची विनंती केली आहे. वाघाचे शोध लावण्याकरिता वन विभागा पूर्ण प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.