- अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
कोरपना -
डालमिया भारत फाऊंडेशन व प्राथमीक आरोग्य केंद्र कवठाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरगाव येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात
बिपी, कॅन्सर, शुगर तपासणी या सारख्या रोगांची तपासणी करण्यात आली. गावातील तब्बल 114 लोकांनी या शिबिरात तपासणी करून घेतली व शिबीर आयोजित केल्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराची सांगता छोटेखाणी कार्यक्रम घेऊन शीबिराला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित अंतरगाव येथील सरपंचा सौ. पोडे मॅडम व उपसरपंचा सौ. पिंपळशेंडे मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा येथील आरोग्य अधिकारी डॉ. बावणे, टाटा ट्रस्टचे डॉ. तुषार रामटेके, डॉ. सूरज सालोंके, दिव्या पार्शिव अंतरगाव उपकेंद्राच्या सीएचओ कु. पूजा दांडेकर, डालमिया तर्फे प्रशांत भिमनवार, डॉ. प्रशांत खिरटकर, कुंडलीकजी देवगडे व गौरव वांढरे, लक्ष्मण कुडमेथे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.