Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोंडो येथील आदिवासी महिलेला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा - गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोगपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके सह शिष्टमंडळाने घेतली पीडित कुटुंबाची भेट शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनि...
  • गोगपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके सह शिष्टमंडळाने घेतली पीडित कुटुंबाची भेट
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
राजुरा तालुक्यातील सोंडो येथील आदिवासी महिला सुनीता मेश्राम यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. महिलेने चक्क नकार देत आव्हानात्मक तोंड देण्याचा प्रयत्न केला तेव्हा उडूतवार व्यक्तीने आपल्याला काय करणार या हेतूने बेदम मारहाण केली. त्या महिलेला चंद्रपूर येथे दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. 
गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिवती तालूकाध्यक्ष ममता जाधव, माजी सभापती भीमराव मेश्राम, हनुमंत कुमरे व प्रा. डॉ. प्रकाश वट्टी यांच्यासह गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या शिष्टमंडळाने सुनीता मेश्राम यांच्या कुटुंबियांची भेटली घेतली.
यावेळी सदर घडलेल्या घटनेची माहिती तिच्या आईने शिष्टमंडळाला अधिक माहिती दिली. सोंडो हे गाव विरूर स्टे. पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने तेथील पोलीस ठाणेदार घडलेल्या घटनेसंदर्भात काय कार्यवाही केली याबाबतीत विचारणा केली असता त्यांनी दोन व्यक्तींवर अट्रॅसिटी ऍक्ट कायदया अंतर्गत अटक केली आहे. बाकी तपास सुरु आहे, आम्ही आरोपीना सोडणार नाही, आरोपी वर कठोर कारवाई करत आदिवासी महिलेला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही ठाणेदार राहुल चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिली. आरोपी वर कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके दिला. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top