Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिक्षक दिनी केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली कडून शिक्षक व विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संस्थेच्या उपलब्धी पुस्तकाचे प्रकाशन आमचा विदर्भचे उपसंपादक व संपादक 'समाज गौरव' पुरस्कारने सन्मानित आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी ना...
  • संस्थेच्या उपलब्धी पुस्तकाचे प्रकाशन
  • आमचा विदर्भचे उपसंपादक व संपादक 'समाज गौरव' पुरस्कारने सन्मानित
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली तर्फे शिक्षकदिनाचे औचित्य साधून स्थानिक धनवटे सभागृहात 
समाजाच्या प्रगतीमध्ये अग्रेसर असणाऱ्यांच्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जे शिक्षक नेहमीच समाजाच्या प्रगतीमध्ये अग्रेसर असतात, ज्यांनी समाजात चांगले विद्यार्थी तयार केले आणि शिक्षण धोरणाचा वारसा पुढे नेला, अश्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' सन्मानाने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात निस्वार्थपणे समाजातील सर्व घटकांसाठी पुढे आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोना वॉरियर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यांनी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सेवा करत असहाय लोकांना न्याय देण्याचे काम केले अश्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना 'समाज गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या उपलब्धी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे अतिथी म्हणून न्यूरॉन हॉस्पिटल नागपूरचे संचालक डॉ. प्रमोद गिरी, धनवटे नॅशनल कॉलेज नागपुरचे जनसंवाद विभाग प्रमुख नितिन कराळे, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजा टाकसाळे, रोटी फोडेशनचे रोहित माडेवार, केंद्रीय मानवाधिकार संगठनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कुमेश्वर भगत, भारतीय जनता पार्टी नागपूर महामंत्री गजानन कापसे, महाराष्ट्र राज्य के.मा.स. उपाध्यक्ष निलेश बोपचे, उपाध्यक्षा के.मा.स. अनिता दारव्हेकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी महासंचालक मदन मैराळ, नागपुर सत्र न्यायालयचे अधिवक्ता राजेन्द्र राठी या सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले. यापाहुण्यांच्याच हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
शासकीय माध्य. उच्च माध्यमिक आश्रम शाळा जामकुळे तहसील सलेकसा जिला गोंदिया येथील टोलीराम राहंगडाले, विनालय हायस्कूल येथील शिक्षिका श्रीमती डायना लिंगेकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले इंग्लिश स्कूल कारधा जिल्हा भंडारा येथील कु.ज्योती पुरुषोत्तम मलोडे, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय,पहेला जिल्हा भंडारा प्रा.सूरज विठोबा गोंडाने, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर प्रा दुषंत नगराळे, नंदगवळी कोचिंग कलासेसचे संचालक डॉ. देवानंद नंदागवळी, उज्वल क्लासेसचे संचालक विपुल जीवने, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजा टाकसाळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 
ह्यूमन वेलफेयर मल्टीपरपज असोसिएशन भद्रावती जि.चंद्रपुर येथील समाज सेविका शाहिस्ता खान पठान, महिलांच्या हक्कासाठी लढा देण्याऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता ठाकरे, रोटी फाउंडेशनचे संचालक डॉ. रोहित माडेवार, केन्द्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ कुमेश्वर भगत, भारतीय जनता पार्टी महामंत्री गजानन कापसे, दक्षिण-पश्चिम महासचिव के.मा.स. मुकुंद शहाने, केन्द्रीय मानवाधिकार संगठन विधि सल्लागार अधिवक्ता मृणाल भोंगाड़े (घाटे), बल्लारपुरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता व प्राणीमित्र श्रुती लोणारे (चिकाटे), आमचा विदर्भ न्यूज पोर्टलचे उपसंपादक अनंता गोखरे, संपादक दीपक शर्मा, ब्लू मिशन मल्टीपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपुर संचालिका सौ. अल्का नरेश मोटघरे, चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते रवि धारने, भीम आर्मी चंद्रपुर महासचिव सुरेंद्र रायपुरे, संजय सायरे, पत्रकार रामेश्वरी नागपूर कु.योगिता भांगे, सामाजिक कार्यकर्ता देवळी जिल्हा वर्धा ऋषभ कारोटकर यांचा समाज गौरवपुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 
प्रास्ताविकेत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहीवले यांनी सांगितले की, संस्था गेली 13 वर्षे कशी काम करत आहे, आजपर्यंतच्या सर्व यशाबद्दल सांगितले. मानवाधिकार संघठन भारताच्या प्रत्येक राज्यात सक्रियपणे कार्यरत असून अनेक प्रशासकीय पदांवर कार्यरत असलेले निवृत्त लोक संस्थेशी संबंधित आहेत. संस्थेच्या सर्व सदस्यांना त्यांच्या क्षेत्रात संघटनेच्या माध्यमाने शोषित-पीडितांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमी झटत राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व भागातील मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top