Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नदीवर पुल नसल्याने नदीच्या पाण्यातून काढावी लागते वाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नदीला जास्त पाणी आल्याने शेतीच्या कामाला लागतोय ब्रेक शिव रस्ते व पांदण रस्त्या अभावी शेती करणे झाले कठीण कुठली आहे हि समस्या... वाचा सविस्त...
  • नदीला जास्त पाणी आल्याने शेतीच्या कामाला लागतोय ब्रेक
  • शिव रस्ते व पांदण रस्त्या अभावी शेती करणे झाले कठीण
  • कुठली आहे हि समस्या... वाचा सविस्तर......
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
कापसी येथील शेतकऱ्यांना नदी ओलांडून शेतात जावे लागते. नदीवर पुल नसल्यामुळे शेतात जाता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामाला ब्रेक लागला आहे. शिव रस्ते व पांदण रस्त्या अभावी शेती करणे झाले कठीण झाले आहे. 
रस्ते हे देशाच्या विकासाचे महत्त्वाचे साधन आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतापर्यंत रस्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शेतामध्ये पोहचण्यासाठी रस्ता महत्त्वाचा आहे. शेती कामासाठी मनुष्य बळाची कमतरता भासत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्याच्या अभावामुळे शेतापर्यंत यंत्रसामग्री पोहचवण्यात अडचणी येतात. तसेच शेतमाल बाजारपेठे पर्यंत नेण्यासाठीही अडथळा निर्माण होतो. पावसाळ्यात शेतात पाणी साचल्याने व चिखलामुळे वाहतूक करणे त्रासदायक होते. ग्रामीण भागात रस्त्याच्या कारणावरून अडचणी निर्माण होतात. तसेच रस्त्याची कामे प्रलंबित पडतात. शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहचवण्यात अडचणी येतात. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते हे नुकसान होवू नये म्हणून शासनाने शिव रस्ते व पांदण रस्ते खुले करण्याची योजना जलद गतीने राबवावी व शेतकऱ्यांना शेत रस्ते खुले करून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top