Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मत मागण्यासाठी नाहीतर जनसामान्यांच्या हितासाठी शिवसेना पाठीशी - बबन उरकुडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मूर्ती येथील असंख्य युवक आणि महिलांचा शिवसेनेत प्रवेश तालुक्यात शिवसेनेचा इनकमिंग जोमात सुरूच अनंता गोखरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - श...
  • मूर्ती येथील असंख्य युवक आणि महिलांचा शिवसेनेत प्रवेश
  • तालुक्यात शिवसेनेचा इनकमिंग जोमात सुरूच
अनंता गोखरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत नवयुवकांचे जोरदार इनकमिंग सुरूच आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला केंद्रित ठेऊन जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. राजुरा तालुक्यात विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात साखरी, अहेरी, बोडखा, साखरवाही, मानोली (बूज.), तुलाना नंतर आता मूर्ती येथे झालेल्या संपर्क अभियानात असंख्य युवक आणि महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान अंतर्गत सुरज नकुलवार, आकाश मडावी, संदीप टेकाम, शुभम गोगलवार, गजानन टेकाम, हर्षल टेकाम, श्रीकांत नक्कलवार, आदित्य गोगलवार, दिनेश मडावी, दिलीप पोतले, छाया शेडमाके, छाया मडावी, लीलाबाई टेकाम, संगीता टेकाम, सुनीता गोगलवार, वंदना टेकाम, लक्ष्मीबाई मोरे, शांताबाई मुट्टलवार, नानाजी टेकाम, विलास मडावी, सचिन टेकाम, सुरेंद्र साडवे, बंडू मडावी, माणिकराव शेडमाके, संतोष टेकाम, वासुदेव टेकाम, अशोक गोगलवार, अजय मुट्टलवार, रमेश नकोलवार आणि असंख्य नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, माजी ग्राप सदस्य अमोल कोसूरकर, जेष्ठ शिवसैनिक प्रदीप येनूरकर, गणेश चोथले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top