Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महामार्ग पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंकज रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी घुग्घुस - महामार्ग पोलिसांतर्फे राज्य महामार्ग क्रं. 7 वर पडोली ते घुग्घुस रस्त्यावरील घुग्घुस येथे वाह...
पंकज रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
घुग्घुस -
महामार्ग पोलिसांतर्फे राज्य महामार्ग क्रं. 7 वर पडोली ते घुग्घुस रस्त्यावरील घुग्घुस येथे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. याप्रसंगी दुचाकी चालवितांना नेहमी हेल्मेटचा वापर करणे, मोबाईलचा वापर टाळणे, कागदपत्रे सोबत ठेवणे, ट्रिपल सीट प्रवास न करणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, सुरक्षित अंतर ठेऊन वाहन चालविणे, खात्री करून वाहणास ओव्हरटेक करणे, वेग मर्यादेचे पालन करणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे, अपघाता समयी मदत करणे अश्या वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या तसेच मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी चंद्रपूर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी, घुग्घुसचे वाहतूक पोलीस विनोद लोखंडे, राहुल मसादे व मोठ्या संख्येत चालक व प्रवाशी उपस्थित होते.
हा प्रबोधनाचा कार्यक्रम डॉ. भूषणकुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक (वा) महाराष्ट्र राज्य मुंबई, श्वेता खेडकर पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर, संजय पांडे पोलीस उपअधीक्षक प्रादेशिक विभाग नागपूर व पोलीस निरीक्षक श्रीमती वैरागडे मॅडम विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top