Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खाकी वर्दीतला शिक्षक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी  विरुर स्टेशन - नुकतीच पंधरा दिवसापूर्वी विरुर पोलिस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून रुजू झालेले राहुल चव्...
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
विरुर स्टेशन -
नुकतीच पंधरा दिवसापूर्वी विरुर पोलिस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून रुजू झालेले राहुल चव्हाण हे ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांना भेट देऊन गावातील शांतता बैठक ,पोलीस पाटलांच्या बैठक ,जनजागरण छोट्या सभा व स्थानिक पत्रकार व तालुक्यातील पत्रकार यांच्या भेटीगाठी घेउन समन्वय स्थापित करण्याचा एक साजेसा प्रयत्न करीत असताना दिसत आहे. यात त्यांनी प्रामुख्याने जादूटोणा विरोधी कायदा संदर्भात, व्यसनमुक्ती व सामजिक बांधिलकी यात मेळ घालून कायदा व सुव्यवस्था कशी  बाधित राहील यावर नेहमी प्रकाश टाकताना दिसून येतं आहे ,मात्र यापलीकडे जाऊन कितीही बिकट परिस्थितीत विद्यार्थी हे शिक्षणापासून कधीही दूर न राहावा याकरिता संबंधीत पालकांनी व समजतील सुशिक्षित घटकांनी यांकडे लक्ष द्यावे जर त्यासाठी माझी कुठलीही मदत भासली तर मला नक्की कळवा असे नेहमीच सांगताना दिसतात ही त्यांची तळमळ बघून यासंबंधी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले अतिशय दुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यात त्यांनी पोलीस अधिकारी होण्या अगोदर सतत सात वर्ष शिक्षक म्हणून त्या भागात कार्य केले , फुले  आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांना पेरत अनेक चांगले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनात काही विद्यार्थी चांगल्या पदावर असल्याने त्यांना याचा खूप आनंद वाटतो. लहानपणापासून पोलीस विभागांत अधिकारी व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून मोट्या जिद्दीने व अथक परिश्रमच्या जोरावर ते पोलीस अधिकारी बनले पण शिक्षणावर आणि शिक्षकी पेशावर असलेलं प्रेम त्यांना  असे वाटते स्वस्थ बसू देत नाही म्हणूनच  विरुर ठाण्याला असे व्यक्तिमत्त्व रुजू झाल्याने खकी वर्दीतला शिक्षक आला असे नागरिकांडून बोलल्या जाते आहे.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. विरूरचे हे भाग्य आहे की एक शिक्षक पोलीस गणवेशात आला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तो विरूरच्या नागरिकांना विशेषतः गैरसमजांविरूद्ध ज्ञान देण्यासाठी तयार आहे. अविनाशला हे आणण्यासाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top