Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथे ऑनलाइन तान्हा पोळ्याचे पारितोषिक वितरण सपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेले व सीमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गड़...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेले व सीमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गड़चांदुर येथे दरवर्षी तान्हा पोळा उसव मोठ्या जल्होशात साजरा केला जातो. मात्र मागीलवर्षी पासून राज्यात कोरोनाचे संकट असल्याने गड़चांदुर येथे तान्हा पोळा उत्सव समिति तर्फे ऑनलाइन तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले. याला कार्यक्रमाला शहरातील बालगोपाळाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत युग सचिन झाड़े याने तान्हा पोळा स्पर्धेत मथुरातील श्रीकृष्ण नगरी ची प्रतिकृति मांडली व प्रथम क्रमांक पटकवला, द्वितीय क्रमांक देवांश एकरे ने पटकीवला. प्रथम व द्वितीय क्रमांक ईश्वर चिठ्ठी टाकून निवडला तर तृतीय क्रमांक सुहानी निवलकर, चतुर्थ चैतन्य ठाकरे, पाचवा हेमन्त परसुटकर, सहावा देवेश टोंगे, सातवा चिन्मय गोरे, आठवा चिन्मय चिव्हाणे, नववा अन्वया कोल्हे, दहावा स्वरा राजूरकर पारितोषिकाचे मनकारी ठरले. या कार्यक्रमात कोविड योद्धा म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी, नगर परिषदेचे प्रमोद वाघमारे, ग्रामीण रुग्णालयाचे बबलू राठोड़ यांचा शाल व श्रीफळ देऊन पोळा समिति तर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रथम नागरिक नगराध्यक्षा सविता टेकाम होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मीनाक्षी एकरे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी न. प. उपाध्यक्ष सचिन भोयर, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकेर, जेष्ठ पत्रकार प्रा.अशोक डोईफोड़े, डॉ शरद बेलोरकर, आनंदराव एकरे, पवन राजुरकर, विक्की उरकूडे, उध्दव पूरी, प्रवीण झाड़े, रोहन काकड़े आदी उपस्थित होते. सर्व विजेत्या तसेच सर्व सहभागी बालगोपालाना
पारितोषिके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. संचालन मयुर एकरे व पवन राजूरकर यांनी केले तर आभार उद्धव पुरी यांनी मानले. याप्रसंगी बालगोपाल पालकसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पोळा उत्सव समितीचे मनोज भोजेकर, पवन राजूरकर, रोहन काकडे, मयूर एकरे यांचा अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top