Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title:
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
 कुटुंबातील सदस्यांनी स्वतः बनवली गणेश व बालाजीची मूर्ती : केला आकर्षक देखावा दररोज शेकडो भाविक घेत आहे दर्शनाचा लाभ राजुरा -  शहरातील प्रति...

 कुटुंबातील सदस्यांनी स्वतः बनवली गणेश व बालाजीची मूर्ती : केला आकर्षक देखावा

दररोज शेकडो भाविक घेत आहे दर्शनाचा लाभ

राजुरा - 

शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नारायणप्रसादजी झंवर यांच्या घरी बसविण्यात आलेल्या गणपती व बालाजी ची आकर्षक मूर्ती व सजावट शहरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. गणपती व बालाजीच्या दर्शनाकरिता दररोज शेकडो भावीक येत असून आकर्षक सजावट पाहून मंत्रमुग्ध होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीपासून सार्वजनिक गणेश महोत्सवात कपात करण्यात आली असली तरी भक्तांच्या उत्साहात मात्र काही कमी झाली नाही हे या वरून सिद्ध होत आहे. २०१३ पासून येथील प्रतिष्ठित व्यायसायिक झंवर कुटुंबातील सदस्य मिळून दरवर्षी स्वतः गणपतीची मातीची मूर्ती व आकर्षक देखावा तयार करीत असतात. गणेशचतुर्थीच्या दोन-तीन महिना अगोदरपासूनच दिवसभर दुकाव्यावसाय रात्री ९ नंतर पहाटे ३ केव्हा ४ वाजेपर्यंत मूर्ती व आकर्षक देखाव्यावर दररोज झटत असतात यावरून या कुटुंबातील प्लॅनिंग, मॅनेजमेंट व संयुक्त कुटुंबाला पूरक अशी भावना लक्षात येते. 

यावर्षी या कुटुंबातील गोपाल, गजेंद्र, श्याम, पंकज व घरच्या स्त्रीशक्तीने स्वतःच्या स्वकल्पनेने गणपती व बालाजीची कवट्या, मणी द्वारे हुबेहूब प्रतिमा तयार केली त्याला साजेशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गणेश सजावट पाहण्याकरिता दररोज शेकडो भाविक येत असून कुटुंबातील सदस्य तेवढ्याच आपुलकीने भाविकांचे स्वागतही करीत आहे. कुटुंबाचे भगवंताप्रती असलेले नाते इतरांनाही प्रेरणादायक ठरत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top