Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 500 बांबू रोपटे लावून जागतिक बांबू दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचा उपक्रम शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - पर्यावरण रक्षणासोबतच औद्योगिक, आर्थिक व सामाजिक विकास साधण्य...
  • बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचा उपक्रम
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पर्यावरण रक्षणासोबतच औद्योगिक, आर्थिक व सामाजिक विकास साधण्याची प्रचंड क्षमता असलेल्या तसेच हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूची पाचशे रोपटे  लावून बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसच्या वतीने जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आला.
मामला येथील मनीष रायकुंडलिया यांच्या शेतात तसेच चिचपल्ली जवळील जांभार्ला स्थित "बांबूटेकच्या" आवारात बांबू रोपट्यांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बांबूटेकच्या संचालिका व बांबू आर्ट अँड नेचर सोसायटीच्या सचिव अन्नपूर्णा धूर्वे-बावनकर यांनी बांबूचे औद्योगिक व सामाजिक महत्त्व विशद करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सोबतच एक प्रशिक्षित बांबू तंत्रज्ञ म्हणून त्यांचा बांबू क्षेत्रातील प्रवास व अनुभव सांगून कोरोना काळात सुद्धा त्यांनी प्रशिक्षित बांबू कारागिरांना कसा रोजगार उपलब्ध करून दिला या विषयी सुद्धा अनुभव कथन केले. बांबू अभ्यासक अनिल दहागांवकर यांनीही बांबूचे विविध उपयोग व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यावसायिक मनिष रायकुंडलिया,  प्रफुल जाधव यांच्यासह बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचे निलेश पाझारे,  राजेश भलमे, भुजंग रामटेके, घनश्याम टोंगे,पंकज हजारे, प्रणय सुखदेवे, समीर नैताम, आकाश आत्राम, देवकन्या नैताम, अनुश्री मेश्राम, किशोर टोंगे, रोशन जुमडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top