- राजुरा तालुक्यात 26484.10 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड
राजुरा -
राजुरा तालुक्यात 26484.10 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बोंड अळीचा पादुर्भाव वाढू नये या करिता मार्गदर्शन करण्यात येत आहे. राजुरा तालुक्यातील देवाडा, सोंडो, पंढरपौनी, गोवरी, धिडशी, मानोली बु., पाचगाव, नोकारी, खंबाडा या गावातील शेतकऱ्यांना आता पर्यंत मार्गदर्शन करण्यात आले असून प्रथम निंबोळी अर्क फवारणी, पक्षी थांबे उभारणे, कामगंध सापळे लावणे यावर माहिती देण्यात आली. सोबतच बोंड अळी निर्मूलनाबाबत मास ट्रापिंग प्रात्यक्षिक, 20 हेक्टर क्षेत्रासाठी कामगंध सापळे व लुर वाटप करण्यात आले. प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी सांगितले कि तालुक्यात 41708 हेक्टर पैकी 37657 हेक्टर वर पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात 26484.10 हेक्टर क्षेत्रावर कपाशी, 725 हेक्टर क्षेत्रावर धान, 3098 हेक्टर क्षेत्रावर तूर, 6994.80 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे.
आज मौजा पाचगाव येथे क्रॉप सॅप अंतर्गत गुलाबी बोंड अळी नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषि अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बोंड अळी साठी एकात्मिक कीड नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले या प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी सी.के. चेव्हान, कृषि सहायक आर.बी. खाटिग, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जबुलवार, रुपेश गेडेकर व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.














टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.