Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अँड. वामनराव चटप यांच्यासह शेकडो विदर्भवाद्यांना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विदर्भवाद्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागपूर -   वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि इंधन- गॅस सिलिंडर द...
  • विदर्भवाद्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -  
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि इंधन- गॅस सिलिंडर दरवाढ विरोध व कोरोना काळातील विज बिल माफी या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज मंगळवारी सकाळी पोलिसांनी उधळून लावले. आंदोलनस्थळी आलेले माजी आमदार ऍड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांच्यासह ३५ जणांना अटक केली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेले हे ठिय्या आंदोलन ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत चालणार होते. काल दुपारी बारा वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच पर्यंत चालले. आज पुन्हा सकाळी १० वाजता हे आंदोलन सुरू होणार होते. यासाठी कार्यकर्त्यांचे आगमन सुरू असतानाच तहसील पोलिसांचा ताफा शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरासमोर आंदोलनस्थळी पोहोचला. पोलिसांनी भराभर कार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमध्ये कोंबले. आंदोलनस्थळी लावलेले बॅनर सुद्धा पोलिसांनी फाडून टाकले, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.
दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. माजी आमदार वामनराव चटप यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक करून सरकार दडपशाही करत असल्याचे मत पत्रकारांशी बोलताना अॅड. दीपक चटप यांनी मांडले. आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांनी मांडले आहे. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top