Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी सुहेल अली यांची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - कोरपना येथील नगरसेवक म्हणून कार्य केलेले शिक्षित धडाडीचे युवा कार्यकर्ते सोहेल अली यांची कोरप...
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना येथील नगरसेवक म्हणून कार्य केलेले शिक्षित धडाडीचे युवा कार्यकर्ते सोहेल अली यांची कोरपना तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितिन भटारकर यांनी नियुक्ती केली. यावेळी वैभव गोरे, आकाश वऱ्हाटे, संदानंद गिरी, मयूर  एकरे, आसीफ किडीया, आदित्य मासीरकर, प्रविण जाधव, विकास टेकाम उपस्थित होते. 
सुहेल अली यांच्या नियुक्तीने युवकामध्ये उत्साह संचारला असून तालुक्याचे ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस युवकाच्या गळयात अध्यक्षपदाची संधी दिली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे संपर्कमंत्री ना, प्राजक्त तनपुरे, जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैद्य, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष नितिन भटारकर, महिला अध्यक्ष बेबीताई उईके, विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद जोगी यांचे आभार मानत सुहेल अली यांनी समाजाच्या अखेरच्या घटकाचा कल्याणाकरिता तसेच पक्षाच्या धोरणानुसार नवयुवकांचे संघटन बांधणी व पक्षाचे कार्यक्रम राबविण्यावर अधिक प्राधान्य देऊ असे मत व्यक्त केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top