Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा पोलीस ठाण्यात दिनांक 27 ऑगस्ट ला शांतता समितीची सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी राजुरा पोलीस न...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा पोलीस ठाण्यात दिनांक 27 ऑगस्ट ला शांतता समितीची सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी राजुरा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे होते. या बैठकीत आगामी काळात येणारे जन्माष्टमी, पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव या सणांचे दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्या संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले. राजुरा शहर हे शांतताप्रिय असून पोलिसांच्या आवाहनाला नेहमीच अनुकूल प्रतिसाद देत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. नगराध्यक्ष अरुण धोटे, नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, राजेंद्र डोहे, भाऊजी कुळसंगे, माजी नगरसेवक डॉ. उमाकांत धोटे, गजानन पहानपटे, शौकत अली, वाघू गेडाम, सुरेश मेश्राम, संतोष देरकर, मंगेश श्रीराम आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी  आगामी सण कोविड 19 अंतर्गत नियमाचे पालन करुन शांततामय वातावरणात पार पाडण्याबाबत सहकार्य करण्याविषयी आश्वस्त केले.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top