Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथे नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी संघटनेचा पुढाकार शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - शेतकरी संघटनेच्या वतीने नेत्र व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश राठोड व डॉ...
  • शेतकरी संघटनेचा पुढाकार
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
शेतकरी संघटनेच्या वतीने नेत्र व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश राठोड व डॉ. प्रतिमा चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. नेत्ररोग तपासणी शिबीराचे अध्यक्षस्थानी अरुण पाटील नवले होते. शिबिराचे उद्घाटन राजुरा विधानसभेचे माजी आमदार वामनराव चटप यांचे हस्ते झाले. तालुक्यातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वितेकरिता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अविनाश मुसळे, बंडू राजूरकर, नीलकंठ कोरंगे, रमाकांत मालेकर, प्रवीण एकरे, अडव्होकेट मुसळे, मोहब्बत खान , सुभाष तूरांकर, नदीम सय्यद, यांनी प्रयत्न केले. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top