Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: युवा शेतकर्‍याची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर ह्यामुळे हताश होऊन राजु बंडू पारखी ह्या 34 वर्ष...
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर ह्यामुळे हताश होऊन राजु बंडू पारखी ह्या 34 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथे उघडकीस आली. 
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील विरूर स्टेशन जवळ असलेल्या धानोरा येथिल युवा शेतकरी राजु पारखी ह्या शेतकऱ्याने निराशेतून व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक 7 ऑगस्ट 2021 च्या रात्री घरीच विष प्राशन केले. मात्र घरच्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मात्र त्याची प्राणज्योत मालवली.
काही वर्षा पासुन सुरु असलेली नापिकी, कोरोना काळात आलेली आर्थिक चणचण व डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याचा भार सहन न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाउल उचलले. ह्यावर्षी उमेदीने त्याने शेतात पेरणी केली होती मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी शिरले व डौलदार होत असलेले पीक अचानक वाहुन गेले त्यामुळे राजु पारखी सतत काळजीत होता. मात्र डोक्यावर असलेले कर्ज व शेताचे झालेले नुकसान ह्यामुळे त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.
राजु पारखी ह्याच्या मागे पत्नी, आई, वडील, 5 व 1 वर्षीय असे दोन अपत्य असुन त्याच्या जाण्याने सर्वावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन त्याचे अवघे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे शासनाने कुटुंबियांना तात्काळ मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top