Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामपूर टी पॉईंटवर ट्रकांची अवैध पार्किंग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताला निमंत्रण विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - शहरालगत असलेल्या रामपूर टी पॉईंट येथे ...
  • पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताला निमंत्रण
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
शहरालगत असलेल्या रामपूर टी पॉईंट येथे सास्ती-गोवरी जोड रस्ता आहे या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात यामुळे वळण रस्तावरून ये-जा करणाऱ्यांना समोरील वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहे. या ठिकाणावरून अनेकदा पोलीस प्रशासनाचे वाहन फिरत असते मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.

रामपूर टी पॉईंट वरून सास्ती-बल्लारपूर, गोवरी-कवठाळा, राजुरा, गडचांदूरकडे जाणारे मार्ग आहे, यामुळे या पॉईंटवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते मात्र याच टी पॉईंटवर वेकोलीतून कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूनी उभे करून वाहन चालक आपल्या घरी जात असतात यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून अनेकदा छोटे मोठया अपघाताच्या घटना घडल्या आहे.

 या वळण रस्त्यालगत घर असून येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक चालकांची एवढी मुजोरी वाढली की ते नागरिकांच्या घरासमोर वाहन उभे करून ठेवत आहे. दररोज पोलीस प्रशासनाचे वाहन या ठिकाणी येत असतात मात्र या अवैद्य ट्रक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाही का करीत नाही असा प्रश्न निर्माण होत असून याकडे पोलीस निरीक्षकांनी लक्ष देऊन अवैद्य पार्किंग वाहनांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top