Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंतप्रधान आवास योजने संदर्भात एम.इ.एल. प्रभाग, इंदिरा नगर वॉर्ड येथे जनतेशी संवाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजीव कक्कड यांनी इंदिरा नगर परिसरातील जनतेशी साधला संवाद शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - महानगर पालिका ने आता पर्यंत 1059 लोका...
  • राजीव कक्कड यांनी इंदिरा नगर परिसरातील जनतेशी साधला संवाद
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
महानगर पालिका ने आता पर्यंत 1059 लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला असून बाकी लोकांना स्वतःचे घर मिळालेले नाही. याच विषयाला घेऊन ११ जुलै लाएम.इ.एल. प्रभाग, इंदिरा नगर वॉर्ड येथील बाँबे ले आउट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनतेशी संवाद व्हावा ह्या करीता शहराचे जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्यास प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी इंदिरा नगर परिसरातील जनतेशी संवाद साधत सविस्तर माहिती घेतली. चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात पंतप्रधान आवास योजने बद्दल काय कागदपत्र आवश्यक आहे हे जनतेला समजावून या विषयाला घेऊन जनतेला सदर योजनेचा लाभ मिळावा याकरीता मोर्चा काढण्यात येईल असे सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, ओबीसी प्रदेश सचिव रामगुंडे, माजी नगरसेवक विनोद लभाने, शहर महासचिव संभाजी खेवले यांनी सुद्धा भाषण दिले. संवाद कार्यक्रमाचे आयोजन शहर सचिव प्रेमचंद टेम्बुरकर, प्रभाग अध्यक्ष नंदकिशोर जोगी, हरेंद्र इंदोरकर यांनी केले होते. बैठकीत इंदिरा नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top